Breaking News

तरुणांना वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणे गरजेचे

अहमदनगर/प्रतिनिधी
“आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी वारकरी चालले आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायाला मोठे महत्व असून वारकरी संप्रदायामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र गुण्या-गोविंदाने राहतात, समाज एकजुटीचे माध्यम म्हणजे धार्मिक कार्यक्रम होय त्यामुळे आजच्या तरुणांना वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणे गरजेचे आहे’’, असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी व्यक्त केले.
केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सामाजिक भावनेतून महात्मा फुले चौक, मार्केटयार्ड येथे देवगड दिंडीचे स्वागत करुन वारकर्‍यांना सचिन जगताप यांच्या हस्ते औषधे व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी नगरसेवक प्रकाश भागानगरे, हिराभाऊ धोंडे, तात्यासाहेब दरेकर, प्रा.गागरे, विपूल शेटीया, मोहन बेरड, विशाल शेटीया, महेश अनमल, सुधीर लांडगे, हेमंत गुगळे, विपूल गांधी, अविनाश साळुंके, मिलिंद क्षीरसागर, राहुल गोरे, शरद डोंगरे, महेश आठरे, अविनाश शेरकर, सुधाकर बोरुडे, विलास शेरकर, सुवर्णा बेद्रे, रुपाली शेरकर, साखरबाई बेद्रे, भारती वालखुरे, मनीषा आठरे आदी उपस्थित होते.