Breaking News

मुस्लिम बांधवांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही कोणत्याही संकटासमोर सर्वात पुढे मी उभा राहील-बदामराव पंडित

गेवराई | प्रतिनिधीः-
शिवसेना हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. मुस्लिम समाजाला वेगवेगळ्या पदांवर शिवसेनेने नेहमी संधी दिलेली आहे. परंतु काही लोक मुद्दाम भीती निर्माण करण्यासाठी चुकीच्या गोष्टी सांगून आपला उद्देश साध्य करून घेत आहेत. मुस्लिम समाजावर आलेल्या कोणत्याही संकटासमोर सर्वात पुढे मी उभा राहील, मुस्लिम बांधवांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाने मनात कोणतीही भीती न बाळगता शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहावे असे आवाहन व ठाम विश्वास शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केला आहे. मादळमोही येथील ६५ लक्ष रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी चळवळीचे युवा पदाधिकारी शेख सिराज यांनी आपल्या १५० सहकार्‍यांसह सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला त्याप्रसंगी बदामराव पंडित बोलत होते कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, गेवराई विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख प्रयेश पाटील, जि प सभापती युधाजित पंडित, युवासेना जिल्हाप्रमुख सागर बहिर, जि प सदस्य बप्पासाहेब तळेकर, बाबुराव जाधव, युवानेते रोहित पंडित, माजी सभापती  पंढरीनाथ लगड, पं स उपसभापती भिष्माचार्य दाभाडे, युवानेते यशराज पंडित, शामराव राठोड, उपजिल्हाप्रमुख शेख एजाज, तालुकाप्रमुख कालिदास नवले, उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, उपतालुकाप्रमुख दिनकर शिंदे, शिवसेना महिला संघटक ऍड उज्वलाताई भोपळे, कृष्णा तात्या भोपळे, शेख इजहार सेठ,  मुजाफर पठाण, आजमखान पठाण, माजी सभापती तुकाराम हाराळे, शेख कौसरभाई, सय्यद मुस्तकीन, जे के बाबुभाई, तारेख  हरबट, रामकिसन भोपळे, भाऊसाहेब माखले, डॉ शहाजी शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी चळवळीतील युवा कार्यकर्ते शेख ख् सिराज भाई यांच्यासह दीडशे पदाधिकार्‍यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला सर्वांचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी स्वागत केले. तत्पूर्वी वरील शिवसेना नेत्यांची पाडळसिंगी पासून शेकडो मोटारसायकल रॅली काढून उघड्या जीपमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बोलताना शेख सिराज भाई म्हणाले की मुस्लिम समाजाला आज पर्यंत शिवसेना-भाजपची भीती घालून कॉंग्रेस-राष्ट्रवादी वाल्यांनी सत्ता उपभोगली परंतु मुस्लिम समाजासाठी ठोस असे कुठलेही काम केले नाही किंवा सुविधा पुरविल्या नाहीत हे आता मुस्लीम समाजाच्याही लक्षात आले आहे, म्हणून दररोज मुिस्लम समाजातील तरुण मोठ्या प्रमाणात बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. बदामराव पंडित यांना आमदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत असा दृढ विश्वासही शेख सिराज यांनी व्यक्त केला आहे. हाच धागा पकडून माजी राज्यमंत्री बदामराव पंडित म्हणाले की गेल्या बावीस वर्षाच्या राजकारणात हिंदुं सोबत मुस्लिम बांधवांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे म्हणूनच तीन वेळेस आमदार आणि मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली जातीय तेढ निर्माण करून मुस्लिम समाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. मतदारसंघात मी असताना कोणाच्याही केसाला धक्का लावनार्‍याची औलाद अजून जन्माला आली नाही, असे ठणकावून सांगत सामाजिक सलोखा राखून सर्वाधिक संधी देणार्‍या शिवसेनेसोबतच मुस्लिम बांधवांनी आता खांद्याला खांदा लावून काम करावे असे आवाहनही बदामराव पंडित यांनी केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा देऊन, टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. विधानसभा संपर्कप्रमुख प्रयेश पाटील यांनी, गेवराई मतदार संघात शिवसैनिक आणि वक्ते मोठ्या प्रमाणात असून येथील शिवसेनाही मजबूत असल्याचे म्हटले. तर जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचे सर्वाधिक नगराध्यक्ष शिवसेनेकडून असल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे सांगून, गेवराई विधानसभा मतदारसंघात बदामराव पंडित यांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. गेवराई मतदारसंघ शिवसेनेलाच असून शिवसैनिकांनी नियोजनबद्ध पद्धतीने व ताकदीने कामाला लागावे असे आवाहन केले.शेख एजाज, कालिदास नवले, कृष्णा तात्या भोपळे,गणेश पवार, ऍड उज्वलाताई भोपळे,आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास अजय औटी, मुकुंद बाबर, मुक्ताराम आव्हाड, रामदास जवरे, बाबुराव डाके, शेवंताबाई वाघ, राहीबाई दाभाडे, आसाराम करांडे, संतोष गिरी, इम्मू पटेल, संतोष काळे, भगवान शेळके, सौरभ काळे, शेख गणीभाई, मस्जिद पठाण, शेख शहेदाद, शेख महेबूब आदींसह ग्रामस्थ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.