Breaking News

श्रीदेवींचा अपघाती मृत्यू नव्हे, खून!

मुंबई / प्रतिनिधी
केरळमधील आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी श्रीदेवी यांचा मृत्यू अपघाती नाही, तर त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. सिंह यांनी त्यांचा सहकारी डॉ. उमादथन भारत यांच्या हवाल्यातून हा आरोप केला आहे.
डॉ. उमादथन भारत हे प्रसिद्ध फॉरेंसिक सर्जन होते. गुन्हेगारी घटना आणि विशेषत: खुनी रहस्य सोडवण्यात ते तरबेज होते. ऋषिराज सिंह म्हणाले, की मी उमादथनशी श्रीदेवी यांच्या हत्येबद्दल बोलत होतो. तेव्हा, त्यांनी मला धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी श्रीदेवींच्या हत्येचा जवळून अभ्यास केला आहे. या तपासावेळी अशा काही घटना समोर आल्या ज्यातून स्पष्ट होते, की श्रीदेवी यांची हत्या करण्यात आली आहे. त्यासंबंधी अनेक पुरावेदेखील आहेत.
ऋषिराज सिंह यांनी उमादथन यांच्या निधनानंतर लेख लिहिताना श्रीदेवींच्या मृत्यूचा उल्लेख केला आहे. ऋषिराज सिंह यांनी उमादथन यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यावर एक लेख लिहिला होता. त्या लेखात त्यांनी श्रीदेवींच्या हत्येबाबत  खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी लिहलेल्या लेखानुसार, कोणतीही व्यक्ती दारुच्या नशेत एका छोट्या बाथटबमध्ये बुडून मरू शकत नाही. 24 फेब्रुवारी 2018ला दुबईच्या एका हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. लग्नसमारंभात श्रीदेवींनी अतीमद्यपान केले होते. त्यानंतर त्या बाथरूमध्ये गेल्या. तिथे तोल जाऊन पडल्या. पडल्यामुळे त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले आणि त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली होती. त्या वेळी त्यांचा मृत्यू अपघाती असल्याचे सांगण्यात आले होते.

ऋषिराज सिंह यांनी लिहलेल्या लेखानुसार, कोणाचाही एखाद्या बाथटबमध्ये बुडून मृत्यू होणे शक्य नाही. त्या बाथटबमध्ये श्रीदेवी अगदी फिट बसत होत्या. श्रीदेवींचे दोन्ही पाय पकडले होते आणि त्यानंतर त्यांचे डोके पाण्यात घालून त्यांना मारण्यात आले, असा दावा सिंह यांनी लेखातून केला आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यावर पुन्हा काही तपास होणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

दुबई सरकारलाही संशय
श्रीदेवी दोन-तीन दिवस रूममधून बाहेर आल्या नव्हत्या, तर त्यांना सोडून बोनी कपूर भारतात का परतला, असा सवाल दुबई सरकारने बोनी यांना विचारला होता. त्या वेळी संशयाची सुई बोनी कपूर यांच्यावर होती; पण त्या वेळी कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, म्हणून श्रीदेवींचा अपघाती मृत्यू झाला असे सांगण्यात आले आणि ते प्रकरण तिथेच बंद करण्यात आले.