Breaking News

चोंभूतच्या उपसरपंचपदी विद्या म्हस्के

  पारनेर/प्रतिनिधी
  पारनेर तालुक्यातील चोंभूत येथे ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समान मत पडल्याने सरपंच यांनी निर्णयनिर्णायक मतदान करुन विद्या म्हस्के यांची उपसरपंचपदी केली निवड.
 पारनेर तालुक्यातील चोंभूत येथील विद्या अंकूश म्हस्के ह्या दि.29 रोजी घेतलेल्या उपसरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. दिड वर्षापूर्वी सत्तास्थापन झालेल्या ग्रामपंचायत मधील उपसरपंच बाळासाहेब मेहेर यांनी राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले होते. यावेळी घेण्यात आलेल्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांपैकी विद्या म्हस्के व रावसाहेब माळी यांनी अर्ज भरले होते. यात विद्या म्हस्के व रावसाहेब माळी यांना समसमान मते पडल्याने व अशा परिस्थितीत निर्णायक मतदान करण्याचा अधिकार हा सरपंचांना असल्याने  सरपंच शिवाजी माळी यांनी विद्या म्हस्के यांच्याबाजूने कौल दिला व त्यांची उपसरपंचपदी निवड केली.
  मतदान प्रक्रियेत सरपंच शिवाजी झुंबर माळी यांच्या अध्यक्षतेखाली सचिव स्वप्नील आंबेटकर ग्रामविकास अधिकारी यांनी भुमिका बजावली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष खाडे, कल्पना दिलीप घोलप, कल्पना पोपट भालेराव, सुरेखा हनुमंत पारखे, शिवाजी दरेकर, संगीता सुभाष माळी, बाळासाहेब मेहेर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.                       
 फोटो ओळ-
 उपसरपंचपदी म्हस्के यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. छाया-शशिकांत भालेकर