Breaking News

महिला महाविद्यालयासमोर धोकादायक ड्रेनेज

अहमदनगर/प्रतिनिधी
तारकपूर बसस्थानकालगत असलेल्या महिला महाविद्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यालगत असलेल्या ड्रेनेजची अवस्था ही अतिशय बिकट झालेली आहे.
सर्जेपुरा पेट्रोलपंपासमोरून महेश थिएटरच्या दिशेन जाताना अलीकडील इन्कम टॅक्स ऑफिसच्या रस्त्याने महिला महाविद्यालयाजवळ व पुढे तारकपूर स्टॅण्ड असा रस्ता गेलेला आहे. याच रस्त्यावर महिला महाविद्यालयासमोर  सुमारे आठ ड्रेनेज मोडले असून या ड्रेनेजची झाकणेही त्यातच पडलेली आहे. वर्दळीच्या भागात असलेली ही ड्रेनेज धोकादायक अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळेस या परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे ही उघडी ड्रेनेज कोणत्याही दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतात.
महिला महाविद्यालयासमोर मोडलेल्या अवस्थेत असलेली ही 8 ड्रेनेज रस्त्यावर सुरू असलेली वर्दळ पाहता अत्यंत धोकादायक ठरू शकतात. ड्रेनेजची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ही ड्रेनेज निखळून पडंली आहेत. रस्त्यावरील झाकणेही सरकून त्यात पडली आहेत. त्यामुळे ही मोकळी झालेली ड्रेनेज परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारी ठरत आहेत.
महिला महाविद्यालय, सरकारी कर्मचार्‍यांच्या आणि नागरी वसाहतीमुळे हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. विशेष करून, महाविद्यालयाच्या मुलींची नेहमीच वर्दळ असते. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत.
 भीज पाऊस सुरू आहे. या भागातील रस्त्यावर खडी पांगवली असून, ती निसरडी झाली आहेत. त्यामुळे चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. हा सर्व परिसर खड्ड्यात आहेत. ही ड्रेनेज उघडी पडल्याने पावसाच्या पाण्याखाली जाऊ शकतात. यातून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही धोकादायक अशी ड्रेनेज दुरुस्तीची मागणी होत आहे.