Breaking News

विधानसभेसाठी मनसेला आघाडीसोबत घेण्यास काँग्रेस सकारात्मक : अशोक चव्हाण

नागपूर
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष कमला लागले असून पक्षातील बडे नेते रणनीती आखात आहेत . भाजप आणि शिवसेना युतीला धूळ चारण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून आपल्या महाआघाडीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सहभागी करून घेण्याबाबत आता काँग्रेसही अनुकूल असल्याचे संकेत काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी यूपीए अध्यक्षा आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ सोनिया गांधी यांची नवी दिल्ली निवासस्थानी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला आघाडीत सामील करून घेण्यासाठी काँग्रेसचा विरोध होता.पण आता काँग्रेसने आपली भूमिका बदलली आहे. आता काँग्रेस पक्ष मनसेला आघाडीत घेण्यात सकारात्मक आहे, असेही चव्हाण म्हणाले. ईव्हीएमबद्दलचे सर्व मुद्दे आम्ही मांडले आहे. ईव्हीएमबद्दल संशय आहे, परंतु आज आमच्याकडे पुरावे नाहीत. मात्र, एक ना एक दिवस सत्य जगासमोर येईल, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादी आणि आघाडीतील राजू शेट्टी यांचा पक्ष, सीपीएम आणि इतर समविचारी पक्षाशी जागा वाटपाबाबत लवकर चर्चा केली जाणार असल्याची माहितीही चव्हण यांनी दिली. यंदाची जागावाटप प्रक्रिया 2009 प्रमाणे होणार नाही. ज्या पक्षाला वाटेल की तो या ठिकाणावरून निवडून येईल त्याला ती जागा देण्यात येईल.