Breaking News

करुणारत्ने नकोसा विक्रम करणारा कर्णधार

मुंबई
आयसीसी विश्‍वचषक स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिकेने लंकेचा पराभव केला. या पराभवासह विश्‍वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याच्या लंकन संघाला जर-तरच्या समीकरणावर अवलंबून रहावे लागणार आहे. या सामन्यात लंकन कर्णधार दिमुथ करुणारत्नेने एका नकोशा विक्रमाची नोंद आपल्या नावे केली.
 सामन्यातील पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर रबाडाने करुणारत्नेला (0) डु प्लेसिसकरवी झेलबाद केले. यासह करुणारत्ने हा विश्‍वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर बाद होणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. याशिवाय, गोल्डन डक नावावर करणारा तो पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे. यापूर्वी आशियातील एकाही कर्णधारावर अशी नामुष्की ओढावलेली नाही. याआधी सर्वप्रथम 1992 विश्‍वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू जॉन राईट हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पहिल्या चेंडूवर बाद झाले होते.पहिल्याच चेंडूवर बाद होणारे फलंदाज
जॉन राईट - 1992 (वि. ऑस्ट्रेलिया)
हनन सरकार - 2003 (वि. श्रीलंका)
ब्रेंडॉन टेलर - 2007 (वि.कॅनडा)
मार्टिन गुप्टील - 2019 (वि. विंडीज)
दिमुथ करुणारत्ने - 2019 (वि. द.आफ्रिका)