Breaking News

महिलांनी ओठ शिवून केला सरकारचा विरोध

नवी दिल्ली
सरकारचा विरोध करण्यासाठी कोण कुठली क्लृप्ती वापरेल सांगता येत नाही. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये पाच महिलांनी सरकारचा विरोध करण्यासाठी चक्क आपले ओठ शिवले आहेत. गेल्यावर्षी निवडणुकांमध्ये झालेल्या कथित गोंधळाबाबत या महिलांनी राष्ट्रपती भवनासमोर ओठ शिवून आपला विरोध दर्शवला. या पाचही महिला निवडणुकींमध्ये पराभूत झाल्या होत्या. महिलांचं म्हणणं आहे की, निवडणुकांमध्ये गोंधळ झाला, ज्या विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. एका महिला डॉक्टरकडून या महिलांनी आपले ओठ शिवून घेतले. या महिला गेल्या 3 महिन्यांपासून सरकार विरोधात प्रदर्शन करत आहेत. त्यांचं म्हणनं आहे की, जे या निवडणुकीत विजयी झाले आहेत, ते पैशांच्या माध्यमातून संसदेत पोहोचले. यांच्यासोबतच आणखी 9 महिलांनी उपोषण सुरू केलं आहे. या महिलांची मागणी आहे की, निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाबाबत एक कमिटी बसवली जावी आणि चौकशी केली जावी.