Breaking News

वरपगाव येथील नागेशपुरी मठ संस्थान तीर्थ क्षेत्र विकास योजनेतून २५ लाख रु निधी मंजूर

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश

केज | प्रतिनिधीः-
केज तालुक्यातील वरपगाव येथील ३०० वर्षापूर्वीच्या तीर्थक्षेत्राला चिंचोळीमाळी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी शासन दरबारी प्रयत्न करून जिल्हा पारिषद च्या तीर्थक्षेत्र विकास मधून २५ लक्ष रुपये मंजूर करण्यात यश मिळविले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि विडा,लव्हुरी,वारपगाव येथील मठ संन्यासी गादी च्या परंपरेचे मठ आहे. हा.पिंपरी नंतर चिंचोलीमाळी सर्कलमधील वरपगाव येथील नागेशपुरी महाराज मठ हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दास्थान आहे.परुंतु आजपर्यंत शासन दरबारी या क्षेत्राच्या तीर्थक्षेत्रात समावेश नव्हता. जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी याबाबत पाठपुरावा करून तीर्थक्षेत्रात समावेश करून २५ लक्ष रुपये मंजुर करून घेतले. ज्याची प्रशासकीय मान्यता करा. ७१०,दि. २४. ०६. २०१९ असा आहे ज्या मधून येणा-या भक्तांसाठी  भक्त निवास इमारत बांधकामासाठी साठी १५ लाख व संरक्षण भिंत बांधकामासाठी १० लाख रूपये निधी मंजूर केला आहे.हा निधी मंजूर करून आणल्याबद्दल नागेशपुरी मठ संस्थानचे मठाद्दीपती श्री.ह.भ.प.महंत भगवान महाराज पुरी यांनी बजरंग सोनवणे  यांचे आभार मानले.