Breaking News

राजेंद्रनगर भागात नूतन ड्रेनेजलाईन टाकावी

अहमदनगर/प्रतिनिधी
“केडगाव येथील प्रभाग 16 मधील शाहूनगर जवळील राजेंद्रनगर या भागात महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून ड्रेनेजलाईनचे कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही. त्यामुळे सांडपाणी, मैलामिश्रित पाणी उघड्यावर सोडले जाते.त्यामुळे मुलांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने या भागात तत्काळ ड्रेनेजलाइन टाकावी’’ अशी मागणी युवासेनेचे शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिलेल्या निवेदनात केली.
यावेळी विधानसभा समन्वयक सुमीत कुलकर्णी, अभिषेक भोसले, स्वप्नील ठोसर, महेश गाडे, आतीश आजबे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, शाहूनगर जवळील राजेंद्रनगर या भागात महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून ड्रेनेजलाईनचे कोणत्याही प्रकारे काम झालेले नाही. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढलेली आहे त्या ठिकाणी ड्रेनेजलाईन नसल्यामुळे सांडपाणी, मैलामिश्रित पाणी उघड्यावर सोडले जाते त्यामुळे तेथील भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच भागामध्ये महानगरपालिकेची अंगणवाडी शाळा असल्याने लहान मुलांची कायम ये-जा असते. पावसाळ्यामध्ये या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठते. त्यामुळे तेथे अपघात  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवेदनाची दखल घेऊन ड्रेनेज (अंदाजे 300 मीटरला) मंजुरी देऊन  काम सुरु करण्याची मागणी करण्यात आली .