Breaking News

दुचाकी धारकांना रेशन न देण्याच्या सरकारच्या निर्णयावर कम्युनिस्टांचा आंदोलनाचा इशारा

नाशिक/प्रतिनिधी
दुचाकी धारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून हद्दपार करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्व थरातून टिका होऊ लागली असून जनसामान्यांच्या मनात निर्माण झालेला आक्रोश व्यक्त करण्यासाठी डाव्या पक्षांनी सरकाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे रेशन कार्डवर धान्य वितरित केले जाते. पांढर्या कार्डला आधीच रेशन बंद केले आहे. केशरी व पिवळ्या रंगाच्या रेशनकार्ड वर शिधा  मिळतो. आता मात्र दुचाकी वाहन कुटुंबात असल्यास रेशन बंद करण्या संदर्भात चर्चा होत आहे. शासनाने असा निर्णय करू नये अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्ह्यच्या वतीने होऊ लागली आहे.या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदाधात म्हटले आहे की, दुचाकी ही प्रवासाची गरज बनलेली आहे. दिवसेंदिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमजोर झाली आहे. ग्रामीण व शहरी भागात कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी दुचाकी शिवाय पर्याय नाही. यामुळे पुर्वीची सायकल जावुन दुचाकी वाहन वापरली जातात. यामुळे तो नागरिक श्रीमंत झाला असा अर्थ होत नाही. यामुळे दुचाकी वाहन धारकांना रेशन सुरू रहावे व अन्न सुरक्षा हक्क कायम ठेवावा अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या  निवेदनात दिला आहे.या निवेदनावर
कॉ. राजू देसले, राज्य सचिव मंडळ सदस्य भा.क.प महाराष्ट्र,  कॉ.भास्करराव शिंदे, जिल्हा सचिव भा.क.प.,  कॉ.महादेव खुडे, शहर सचिव विजय दराडे, जिल्हा संघटक आयटक कामगार संघटना,  कॉ.दत्तू तुपे, जि. सहसचिव अ‍ॅड राजपाल शिंदे, अ‍ॅड दत्तात्रय गांगुर्डे, रतन रोहोम, छोटू रोहोम, ज्ञानेश्‍वर चोळके, काळु गांगुर्डे, निवृत्ती कसबे, जनार्दन चव्हाण आदींच्या सह्या आहेत.