Breaking News

लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी प्रा.शेटे

कोपरगाव / ता.प्रतिनिधी
लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी गणेश शैक्षणिक संस्थेचे प्रमुख प्रा. विजय शेटे यांची तर लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी कामिनी विजय शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

     नुकत्याच झालेल्या लायन्स क्लब संचालक मंडळाच्या सभेमध्ये लायन्स, लायनेस लिओ क्लबची कार्यकारिणी राजेश ठोळे यांनी जाहीर केली. लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी विजय शेटे यांची निवड करण्यात आली. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान व सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांची या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच सचिवपदी कांतीलाल वक्ते, खनिजदार पदी  सीए स्वप्नील भंडारी यांची निवड करण्यात आली.

     लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी कामिनी शेटे यांची तर सचिवपदी भावना गवांदे, खनिजदारपदी  नेहा गुजराथी यांची निवड करण्यात आली. लिओ क्लबची कार्यकारिणी अशी _ अध्यक्ष सिद्धांत बागरेचा , सचिव रोहित पटेल, खनिजदार निखिल खुबानी, कॅबिनेट तुलसीदास खुबानी, संदीप कोयटे, डॉ अभिजित आचारी, सुधीर डागा, राम थोरे. ही कार्यकारिणी माहिती जनसंपर्क अधिकारी सत्यम मुंदडा यांनी जाहीर केली.