Breaking News

एकाच वेळी 10 लाख विद्यार्थी साकारणार सौरदिवे

मुंबई
गांधी जयंतीनिमित्त देशभरात सव्वा लाख सौरदिवे बनवण्याचा विक्रम आयआयटी मुंबईतील प्राध्यापक चेतन सिंग सोलंकी यांनी मागच्या वर्षी आपल्या नावावर नोंदविला आहे. यंदा ते गांधी जयंतीनिमित्त जगभरात एकाचवेळी तब्बल 10 लाख विद्यार्थ्यांना सौरदिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचा अनोखा विक्रम करणार आहेत. भारतात हा कार्यक्रम नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडीयममध्ये होणार आहे.
मुंबईत आजही देशातील चार कोटी घरे विजेविना आहेत. तर अनेक घरात पुरेसा प्रकाश नाही. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे. अशा विद्यार्थ्यांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटी मुंबईने सौरदिवे तयार करून ते सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. आज जगभरात कार्बन उत्सर्जनाची समस्या भेडसावत आहे. ती कमी करण्यासाठी जगभरात प्रयत्न होत आहेत. असे असताना भारतानेही यात पुढाकार घेतला असून सौरऊर्जेचा अधिक वापर कसा करता येईल, यावर भर दिला जाऊ लागला आहे. याचाच एक भाग म्हणून आयआयटी मुंबईतील प्राध्यापक चेतन सिंग सोळंकी यांनी सौरऊर्जेचा वापर करून गावगावातील विद्यार्थ्यांना वीज उपलब्ध करून देण्याचा ध्यास घेतला. पीएचडी करत असताना त्यांनी सौरऊर्जा साठवून ठेवणार्‍या उपकरणावर ते संशोधन करत होते. याचा वापर करून त्यांनी देशभरातील विविध राज्यांमध्ये ग्रामीण भागात दहा लाख सौर दिवे वाटले आहेत. इतकेच नव्हे तर तीन हजार महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. या महिलांना सौरदिवे तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांनी तेच विकून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. केंद्र सरकारच्या निधीतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ते गेले वर्षभर जगभ्रमण करून विविध देशांमध्ये जाऊन सौरऊर्जेचे महत्त्व सांगत होते. तसेच या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन विविध देशांनी येत्या  2 ऑक्टोबर रोजी या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. या दिवशी भारतासह विविध देशांमध्ये दहा लाख विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांना त्यांच्या भागात प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमात कोणीही सहभागी होऊ शकतो यासाठी इच्छुकांनी ुुु.ससीू.ळप वर नाव नोंदणी करावी असे आवाहन प्रा. सोळंकी यांनी केले आहे.
एक लाख घरांत शून्य वीजबील
वीजेचा वापर जेवढा वाढतो तेवढे कार्बन फूट प्रिंट वाढते. यामुळे केवळ सौरदिवे देऊन उपयोग नाही, जेव्हा घराघरात सौरऊर्जेचा वापर होईल तेव्हाच खरे ध्येय साध्य होईल, असे मत प्रा. सोळंकी यांनी व्यक्त केले. यामुळे येत्या गांधी जयंतीनिमित्त पुढील वर्षभरात एक लाख घरांना सौरऊर्जेवर आणण्याचा आमचा मानस असल्याचेही ते म्हणाले.