Breaking News

मुळा धरण ओव्हरफ्लो : जायकवाडीकडे 11 मोर्‍यातून सोडले पाणी

राहुरी/प्रतिनिधी
  अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणातून आज (दि.8) सायंकाळी 5 वाजता 11 मोर्‍याद्वारे 4 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले.
  आमदार शिवाजी कर्डिले यांनी कळ दाबल्यानंतर मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावले. 26 टीएमसी क्षमता असलेल्या मुळा तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. त्यामुळे आज सायंकाळी 5 वाजता धरणातून जायकवाडी धरणाकडे पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे खात्याने नदीकाठी राहणार्‍या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. धरणातून 11 मोर्‍यातून पाणी सोडण्यात आले आहे. पाटबंधारे खाते पाण्याच्या पातळीकडे लक्ष ठेऊन असल्याचे मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले.अकोले तालुक्यातील धरण परिसरात पाऊस सुरू आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. परिमाणी धरणात नवीन पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरण देखील भरले आहे. या धरणातील पाणी जायकवाडी धरणाकडे सोडण्यात आले आहे. धरणाच्या 11 मोर्‍या खुल्या करण्यात आल्या असल्याने नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशार देण्यात आला आहे.