Breaking News

शिबिरासाठी 33 कनिष्ठ हॉकीपटूंची निवड

नवी दिल्ली
हॉकी इंडियाने सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेच्या तयारीसाठी 33 कनिष्ठ खेळाडूंची निवड केली असून 12 ऑगस्टपासून बेंगळूरमध्ये त्यांची शिबिर घेतले जाणार आहे.
या खेळाडूंत तीन गोलरक्षक, प्रत्येकी 10 बचावपटू, मध्यफळी व आघाडीपटूंना निवडण्यात आले आहे. 20 दिवस चालणाऱया या शिबिराची सांगता 31 ऑगस्ट रोजी होणार आहे. भारतीय कनिष्ठ संघ नवव्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत सहभागी होणार असून ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा मलेशियात होणार आहे. फिटनेस व लय राखणे यावर शिबिरात भर दिला जाणार आहे. ‘गेल्या जुलैमध्ये निवडलेल्यातील बहुतेक सर्व खेळाडूंना यात स्थान देण्यात आले आहे. फिटनेस, लय व चपळता राखणे हाच या शिबिराचा मुख्य उद्देश आहे,’ असे हॉकी इंडियाचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर डेव्हिड जॉन यांनी सांगितले. ‘या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात सुलतान जोहोर चषक स्पर्धा होणार असल्याने खेळाडूंना त्यासाठी जास्तीत जास्त ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

शिबिरासाठी निवडलेले खेळाडू 
गोलरक्षक -पवन, प्रशांत कुमार चौहान, साहिल कुमार नायर. बचावपटू : सुमन बेक, प्रताप लाक्रा, संजय, सुंदरम सिंग रजावत, मनदीप मोर, परमप्रीत सिंग, दिनाचंद्र सिंग मोईरंगथेम, नबिन कुजुर, शारदा नंद तिवारी, निरज कुमार वारिबम. मध्यफळी-सुखमन सिंग, गेगरी झेस, अंकित पाल, आकाशदीप सिंग ज्युनियर, विष्णू कांत सिंग, गोपी कुमार सोनकर, विशाल अँटिल, सूर्या एनएम, मनिंदर सिंग, रबिचंद्र सिंग मोईरंगथेम. आघाडीपटू-सुदीप चिरमाको, राहुल कुमार राजभर, उत्तम सिंग, एस. कातीं, दिलप्रीत सिंग, अरायजीत सिंग हुंदाल, अमनदीप सिंग, प्रभज्योत सिंग, शिवम आनंद, अर्शदीप सिंग.