Breaking News

उल्हासनगर शहराच्या 70व्या स्थापना दिना निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन

उल्हासनगर 
 उल्हासनगर शहरात आज 70वा स्थापना दिन साजरा करत 71 व्या वर्षात, मोठ्या हर्षोल्लासात पदार्पण केले. शहरातील विविध भागात अनेक सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
8 ऑगस्ट 1949 रोजी, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांच्या हस्ते, ह्या शहराची कोनशिला ठेवण्यात आली होती. खरेतर हे शहर, पाकिस्तानातून विस्थापित झालेले व निर्वासित सिंधी समुदायास वसवण्या हेतु जन्मास आले. उल्हास नदीच्या काठी वसलेले असल्याने, सी. राजगोपालाचारी यांनी याचे नामकरण, उल्हासनगर असे केले. ह्या सत्तर वर्षात, शहराने उभ्या राज्यावर आपली छाप, अनेक क्षेत्रात केलेल्या चमकदार कामगिरी मुळे उमटवली आहे. आज सकाळ पासूनच शहरातील विविध भागात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8.30 वा रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर, रोट्रॅक्ट क्लब, सी. एच एम. महाविद्यालय इथे कार्यक्रम पार पडले तर, गोलमैदानच्या मुख्य द्वारा जवळ स्थापित शिलालेखास, ज्यावर स्वतंत्रता संग्रामात सहभागी झालेल्या शहीदांचे नाव कोरलेले आहे, त्यास अनेक दिग्गजांनी पुष्प अर्पण करून, आठवण ताज्या केल्या. सकाळी 9 नंतर मनपा कार्यालया मागे स्थित असलेल्या साई बलराम जलतरण तलावाच्या प्रांगणात, जिथे मुख्य शिलालेख स्थापित आहे तिथे ही जोमात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 10 वा सिंधी काउंसिल ऑफ इंडिया, उल्हासनगर आणि सिनियर सिटीझन क्लब द्वारा बुलंद ऐ बेमिसाल उल्हासनगर नामक सांस्कृतिक कार्यक्रम, रोटरी मिडटाउन पार्क हॉल, गोलमैदान उल्हासनगर, येथे आयोजित करण्यात आला.
आई लव उल्हासनगर ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन उमनपा, रोटरी क्लब उल्हासनगर, सपना गार्डन आणि विराट अम्बे स्पोर्टस क्लब द्वारा संयुक्त रित्या साजरा करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता तरण तलावाच्याच प्रांगणात अन्याय विरोधी संघर्ष समिति तर्फे कोनशिलास अभिवादन करून, शहरासाठी जनहितार्थ काम करणार्‍या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. वांगणी येथील महालक्ष्मी एक्स्प्रेस प्रसंगी व वरप, कांबा येथील पुरग्रस्तांना मदतीसाठी एन डी आर एफ सोबत खांद्याला खांदा लावून काम केलेल्या उमनपाचे अग्निशमन दलाच्या अधिकारी भास्कर मिरपगार व कर्मचारी आणि समाजसेवक परमानंद गरेजा, उल्हास बिरादरीचे शशीकांत दायमा, माजी नगरसेविका लता निकम, समाजसेविका वनिता गंभीर व विविध संघटनांचे कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. ह्या वेळेस समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर व पत्रकार सुभाष भोसले, सुखनंदन गवई, जसवंत ढकोलिया, सलीम मंसुरी व पदाधिकारी आनंद महाजन, राजु फक्के, कुमार रेड्डीयार आदि उपस्थित होते. ह्या वेळी मालवणकर यांनी कोनशिला, शहराच्या मध्यभागी असलेल्या टाऊनहॉल येथे स्थानापन्न करून पावित्र्य राखण्याचे आवाहन महापालिकेच्या प्रशासनास केले आहे.