Breaking News

कोपरगावचे ग्रामसेवकही आंदोलनात सक्रिय

कोपरगाव / ता.प्रतिनिधी
राज्यातील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी असहकार आंदोलन सुरु करण्यात आले आहे.  त्या आंदोलनात कोपरगाव तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ही सामिल झाले आहेत.  मागण्या मान्य न केल्यास सर्व ग्रामसेवक काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा कोपरगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंडित वाघीरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

 संघटनेच्या वतीने राज्य पातळीवर जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी, प्रवास भत्ता रकमेत वाढ करण्यात यावी, ग्रामसेवक ऐवजी ग्रामविकास अधिकारी दर्जा मिळावा या व इतर विविध मागण्या केल्या आहे. यात कोपरगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष जी.पी.शेळके, उपाध्यक्ष डी.बी.गायकवाड, सचिव एन.डी.खेडकर, मानद अध्यक्ष बी.एम.गुंड, आर.पी.सय्यद ,डी.एन.बनकर आदींसह सर्व ग्रामसेवक सहभागी झाले आहे.