Breaking News

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अखेर सुरू

कोल्हापूर
पुणे-बंगळुर महामार्गावर शिरोली सांगली फाटा येथे महामार्गावरील अवजड वाहतूक सोमवारी सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आली आहे. कराड ते कोल्हापूर या मार्गावर अडकून पडलेले हजारो ट्रक आता पुराच्या पाण्यातून वाट काढत बंगळुरुच्या दिशेने पुढे निघाले आहेत. सकाळपासून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
महामार्गावर प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल, गॅसचे टँकर, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणार्‍या वाहनांना वाहने प्राधान्यांने कोल्हापूर शहरात दाखल होत आहेत. अद्यापही कोल्हापूर जिल्ह्यातील 100 हून अधिक बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, पाणी ओसरताच या खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी, सफाई करून तातडीने वाहतूक पूर्वपदावर आणायला हवी. राज्यभरातून मनुष्यबळ आणि संसाधने मागवा, पण तातडीने ट्रान्सफॉर्मर आदींची दुरूस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करावीत. पूरग्रस्त भागातील रस्ते वाहतूक आणि वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.