Breaking News

सुरेश रैनाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

लखनौ
टीम इंडियाचा डावखुरा शैलीदार फलंदाज सुरेश रैनाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबत बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यापासून रैनाला गुडघेदुखीचा त्रास जाणवत होता, यामुळे त्याच्यावर ऍमस्टरडॅम येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला 6 ते 8 आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. रैना रणजीमध्ये उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करतो. यामुळे आगामी रणजी हंगामात तो खेळणार की नाही याबाबत सांशकता आहे.