Breaking News

फैसल शाह नजरकैदेत

नवी दिल्ली
माजी आयएएस अधिकारी आणि जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंटचे अध्यक्ष शाह फैसल यांना बुधवारी पोलिसांनी दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले. शाह फैसल परदेशात जात होते; मात्र त्याआधीच त्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यातर्गंत ताब्यात घेण्यात आले. त्यांना दिल्लीतून काश्मीरला परत पाठविण्यात आले आहे. फैसल यांना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवले आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केले, तेव्हापासून शाह सतत वादग्रस्त वक्तव्ये करत होते. आमच्यासमोर दोन मार्ग आहेत. काश्मीरने कठपुतळी अथवा फुटीरतावादी बनावे. याशिवाय दुसरा पर्याय नाही. राजकीय अधिकार पुन्हा मिळवण्यासाठी काश्मीरला दीर्घकाळ चालणार्‍या अहिंसक राजकीय आंदोलनाची गरज आहे, असे त्यांनी म्हटले होते.