Breaking News

संगमनेर क्रीडांगणाच्या आरक्षणात बदल

संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेर येथील क्रीडांगणाच्या आरक्षित जागेपैकी काही क्षेत्र वगळून प्राथमिक शाळा व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यास मंगळवारी (१३ ऑगस्ट) मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

 संगमनेर बुद्रूक येथील सर्व्हे क्रमांक १५३ व १५४ या आरक्षण क्रमांक ७६ वर क्रीडांगणाचे आरक्षण आहे. सर्व्हे १५३ मधील ४२५० चौरस मीटर क्षेत्र क्रीडांगण आरक्षणातून वगळून प्राथमिक शाळा व खेळाचे मैदानासाठी आरक्षित करण्याचा ठराव नगरपालिकेने १० ऑक्टोबर २०१७ रोजी केला. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम - १९६६ अन्वये सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाला सादर करण्यात आला होता. त्यास मंत्रिपरिषदेने मंजुरी दिली. या वापर बदलामुळे प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान या सार्वजनिक वापरासाठी ही जागा उपलब्ध होणार आहे.