Breaking News

कर्जतच्या जैन स्थानकात चातुर्मास उत्साहात

कर्जत/प्रतिनिधी
 भगवान महावीर स्वामीच्या विचारावर तप साधना करत दान धर्म करून सर्वाना बरोबर घेऊन चालणारा जैन समाज असून यातील सर्वात कठीण मासखमन तपस्या करनार्‍या वर्षा कोठारी यांचे कौतुक केले. कर्जत येथे प.पु. महासतीजी उदयप्रभाजी व प.पु.महासतीजी करुणाप्रभाजी यांचा चातुर्मास जैन स्थानकामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. यानिमित्त येथे विविध तपस्या होत आहेत. येथील वर्षा कोठारी यांच्या 32 उपवासाची पचकावणीनिमित्त जैन श्रावक संघाच्यावतीने जैन स्थानकापासून तपस्यार्थीची मिरवणूक काढण्यात आली.
 या मिरवणुकीत मोठ्या संख्येने जैन धर्मीय सहभागी झाले होते. महिलांनी फेटे घालून अत्यंत शोभा आणली. घोषणा देत मिरवणूक मुख्य कार्यक्रमस्थळी आल्यानंतर प.पु. महासतीजी उदयप्रभाजी यांचे प्रवचन झाले. कार्यक्रमामध्ये जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक कोठारी यांनी स्वागत केले. प्रसाद शहा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बारामती अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या संचालिका सुनंदा पवार, नगराध्यक्षा प्रतिभा भैलूमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, उज्ज्वला संघवी, चंदनबाला बोरा, स्वाती बोरा, अ‍ॅड.एन.बी. कदम, अ‍ॅड.बाळासाहेब शिंदे, विजय अनारसे आदींनी मनोगते व्यक्त केले. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना जैन समाजातील विविध चांगल्या प्रथाचे कौतुक केले. कर्जत शहरात भगवान महावीर चौक सुशोभीत करण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी मासखमनची तपस्या करणार्‍या वर्षा कोठारी यांची 31 उपवासाची पचकावनी झाली. श्रद्धा बोरा, खुशी भंडारी, अशोक कोठारी या तिन लहान मुलींनी तेल्याची पचकावणी झाली. यावेळी नंदकिशोर भैलुमे, वैभव शहा आदी उपस्थित होते.