Breaking News

पारनेर राष्ट्रवादीच्यावतीने पूरग्रस्तांसाठी मदत

 पारनेर/प्रतिनिधी
 कोल्हापूर, सातारा, सांगली येथे झालेले आपत्कालीन पूरस्थितीत संपूर्ण राज्यभरातून या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ चालू आहे. पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आटा, तांदूळ, बिस्किट, पिण्याचे पाणी, ब्लांकेट यासह अनेक जीवनावश्यक वस्तू या पूरग्रस्तांना अल्पशी मदत केली व दोन गाड्या कोल्हापूरच्या दिशेने रवाना आल्या आहेत.
 तालुक्यातील शिरापूर, चोंभुत, सुपा, टाकळी ढोकेश्‍वर या ठिकाणा वरून या जीवनावश्यक वस्तू जमा करून टाकळी ढोकेश्‍वर येथून  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नीलेश लंके यांच्या उपस्थितीत या वस्तूने भरलेल्या दोन गाड्या कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, मधुकरजी उचाळे मित्र मंडळ, बबलू रोहोकले, पंचायत समितीचे मा.सभापती सुदाम पवार, दत्ता आवारी, नामाशेठ पवार, लाकूडझोडे, बाप्पू शिर्के, विजय औटी, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब खिलारी, महेश झावरे, दामोदर झावरे, अरुण पवार, श्रीकांत चौरे, दौलत गांगड, दत्ता निवडूंगे, अंकुश म्हस्के उपस्थित होते.