Breaking News

शिक्षणामुळेच समाजाचे ऋृण फेडता येतात : कुलकर्णी

कान्हूर पठार/प्रतिनिधी
 शाळेच्या वयातील संस्कार अत्यंत महत्वाचे असून या संस्काराच्या आधारावरच पूढील आयुष्याचा पाया भक्कम होतो.शिक्षणामुळेच समाजाचे ऋृण फेडता येतात. असे प्रतिपादन प्राध्यापक गुरुराज चिकुराज कुलकर्णी यांनी केले.
 श्री साईनाथ हायस्कूल अळकुटी येथे ईयत्ता 5 वी ते 12 वी. मध्ये प्रथम क्रमांक मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना प्रत्तेकी रोख दोन हजार रूपयांचे पारीतोषिक मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य शंकरराव माने होते. या वेळी सरपंच बाबाजी भंडारी, उपसरपंच मधुकर जाधव, कुंदनकाका साखला, नामदेव घोलप, कुलकर्णी, प्राचार्य मंगेश जाधव, उपमुख्याध्यापक गाडीलकर, पायमोडे उपस्थित होते.
 गुरुराज कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण अळकुटी मधील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात झालेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या विद्यालयातील प्रत्तेक वर्गात प्रथम क्रमांक मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना रोख दोन हजार रूपये पारितोषिक देतात. या कार्यक्रमासाठी ते सहकुटूंब मुलगा व सुनेसह पुण्यावरुन आले होते.