Breaking News

संजीवनीत घडते विद्यार्थ्यांचे भवितव्य : आ. कोल्हे

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा

कोपरगाव ता/प्रतिनिधी
  संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला गुणवत्तापुर्ण शिक्षणाची प्रदिर्घ परंपरा आहे. येथे सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरीक घडविले जातात. त्यामुळेच संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नाव देशात अग्रभागी आहे. या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल असणार आहे.असे प्रतिपादन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
  संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख म्हणून आ. कोल्हे बोलत होत्या. यावेळी माजी परराष्ट्र मंत्री कै.सुषमा स्वराज यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मंचावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, सचिव ए.डी. अंत्रे, प्राचार्य डॉ.डी.एन. क्यातनवार, उपप्राचार्य डॉ.ए.जी.ठाकुर, समुपदेशक प्रविण ग्रंभिर, उपस्थित होते.
  आ.कोल्हे पुढे म्हणाल्या की, पुर्वी मुलींचे टॅलेंट चार भिंतींमध्येच कोंडलेले असायचे. आता मात्र, काळ बदलला, पिढी बदलली. पुर्वी अभियांत्रिकी सारख्या व्यावसायिक शिक्षणाला पालक मुलींना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवित नव्हते, परंतु कोपरगाव सारख्या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केल्याने अनेक मुली इंजिनिअर होवू शकल्या. आणि आता त्या स्वत:कर्तृत्व सिध्द करीत आहे. आज ग्रामिण भागातील सावित्रीच्या लेकी प्रगतीची उंच भरारी घेत आहे.
 यावेळी अमित कोल्हे म्हणाले की, संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ही अ‍ॅटोनॉमस संस्था झाल्यामुळे येथून जागतिक पातळवर नावलौकिक असणार्‍या उद्योगांना लागणारे आधुनिक ज्ञान प्राप्त केलेले अभियंते येथून तयार हेाणार आहेत. नवोदित अभियंत्यांची रोजगारभिमुखता वाढीस लागून पालकांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी संजीवनी आता अधिक जोमाने कार्य करणार आहे. मात्र, विध्यार्थ्यानी आणि पालकांनी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालया अंतर्गत राबविण्यात येणार्‍या उपक्रमांना पहिल्या दिवसापासून साथ देणे गरजेचे आहे.