Breaking News

अनैतिक संबंधातून शेवगावमध्ये खून

तीन तासांत गुन्ह्याची उकल ; तिघांना अटक 


शेवगाव/प्रतिनिधी
 शेवगावमध्ये बापूसाहेब घनवट याचा खून हा नाजूक प्रकरणातून झाला असून, यात शेवगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कृष्णासिंग पुनमसिंग भोंड (वय22), परमेश्‍वर पुनमसिंग भोंड (वय 19) व लक्ष्मण किसन कांबळे (वय 30, तिघे रा.रामनगर, ता. शेवगाव) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
 बापूसाहेब घटवट याचा मृतदेह सकाळी आयटीआयसमोरील मोकळ्या जागेत गवताखाली लपवून ठेवल्याचे आढळून आले होते. त्याचा चेहरा ठेचलेला आणि पोटावर जबर मार होता. या प्रकारामुळे शेवगावमध्ये खळबळ उडाली होती. शेवगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांनी या खुनाच्या गुंत्याची उकल करण्यासाठी तीन पथके नेमले. पथकाने या खुनाच्या गुन्हाचा गुंता अवघ्या तीन तासात उलगडला. बापूसाहेब याचा खून नाजूक प्रकरणातून झाल्याचे तपासात पुढे आले आहे. खुनाच्या घटनास्थळापासूनच काही अंतरावर एका महिलेचे घर आहे. या महिलेशी बापूसाहेब याचे अनैतिक संबंध होते. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्यावर खुनाच्या गुन्ह्याचा गुंता उलगडला. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली.
 बापूसाहेब याच्या डोक्यात लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याचे आरोपींनी पोलिसांनी केलेल्या चौकशीत माहिती दिली. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अतिरीक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुजित ठाकरे, उपनिरीक्षक भरत काळे, सोपान गोरे, पोलिस नाईक राजू चव्हाण, राजेंद्र केदार, महादेव घाडगे, शिपाई प्रवीण बागूल, वसुदेव डमाळे, राजेंद्र नागरगोजे, संदीप दरवडे, सोमनाथ सोनटक्के, किशोर शिरसाठ, अभय लबडे, बाळासाहेब नागरगोजे, अमोल ढाळे यांनी गुन्ह्याचा तपास केला.