Breaking News

संयुक्त राष्ट्रसंघाचा पाकिस्तानला दणका

काश्मीर प्रश्‍नांवर बोलणे जोना वॉर्नेका यांनी टाळले

न्यूयार्क
भारताने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करुन राज्याचे दोन केंद्र शासित प्रदेश केल्याने पाकिस्तान संतापला आहे. त्याने हा विषय संयुक्त राष्ट्रात नेला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदच्या वर्ल्ड बॉडीला पत्र लिहीले आहे. मात्र संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदचे अध्यक्ष जोना वॉर्नेका यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. संयुक्त राष्ट्रात हा पाकिस्तानला हा मोठा झटका आहे.
भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत हा विषय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत घेऊन जाणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्राच्या स्थायी सदस्या मलीहा लोधी यांनी सुरक्षा परिषदेला पत्र सादर केले. सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष वॉर्नेकाना यांची भेट घेतली.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी संयुक्त परिषदेचे सेक्रेटरी अ‍ॅटोनिओ गटरेस्ट यांना पत्र लिहून जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्याने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे उल्लंघन झाले आहे, असा दावा केला होता. पत्रकार परिषदेत या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात वॉर्नेका यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ‘नो कॉमेंट’ म्हणून विषय संपवला. याआधी सेक्रेटरी अ‍ॅटोनिओ यांनी 1972 ला झालेल्या द्विपक्षीय शिमला करारात काश्मीर प्रश्‍न शांततेने सोडवण्याचे मान्य केल्याची आठवण करुन देत या कराराला धक्का पोहचणार नाही याची काळजी दोन्ही देशांनी घ्यावी, असे म्हटले होते.