Breaking News

पूरग्रस्तांसाठी ग्रामसेवक देणार एक दिवसीय वेतन

अहमदनगर/प्रतिनिधी
“कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पुराच्या संकटामुळे या भागात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत मदत म्हणून राज्यातील 22 हजार ग्रामसेवक एक दिवसाचे वेतन देणार आहेत.
याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना पत्र देऊन ग्रामसेवकांचे एक दिवसाचे वेतन कपात करून ते मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याची विनंती केली आहे.
जवळपास 3 कोटी रुपयांची मदत ग्रामसेवक संवर्ग या माध्यमातून करणार आहे. सध्या पूरग्रस्त भागात ग्रामसेवक युनियनच्या शाखा मदत कार्यात अग्रेसर असून पडेल ती कामे करून पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहचवत आहेत’’, अशी माहिती युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिली.