Breaking News

दिल्लीकरांना ’फ्री’ इंटरनेट सेवा केजरीवाल सरकारचा निर्णय

नवी दिल्ली
दिल्लीतील आम आदमी सरकारने फ्री इंटरनेटची घोषणा केली आहे. येत्या 3 ते 4 महिन्यात मोफत वायफाय सुविधेला सुरुवात होईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष म्हणजे आम्ही निवडणुकांच्या जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांची पूर्तता करत आहोत. त्यामुळे निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन असं काहीही नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्लीत तब्बल 11 हजार ठिकाणी हॉटस्पॉट लावले जाणार आहेत. एवढेच नाहीतर मोफत वायफाय सुविधा देखील लवकरच सुरू केली जाणार आहे. ज्यामुळे प्रत्येक वापरकर्त्यास 15 जीबी डाटा प्रत्येक महिन्याला मोफत दिला जाईल आणि हा यासाठीचा पहिला टप्पा असल्याचेही त्यांनी सांगितले. या मोफत इंटरनेट योजनेतून प्रत्येक युजर्सला 15 जीबी डेटा दरमहा वापरता येईल. या इंटरनेटचा स्पीड 200 एमबीपीएस एवढा असून पुढील 3 ते 4 महिन्यात वायफाय आणि सीसीटीव्ही सेवा सुरू होणार आहे.