Breaking News

कोपरगाव शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर

कोपरगाव / ता.प्रतिनिधी
कोपरगाव शहर शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करून नवीन शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क नेते रामदास कदम, शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरूळकर, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र दराडे, विधानसभा संपर्कप्रमुख अनील म्हापनकर यांच्या मार्गदर्शनानुसार शुक्रवारी शहर प्रमुख सनी वाघ यांनी जाहीर केली. यात उपशहर प्रमुखपदी नगरसेवक अनील आव्हाड, बालाजी  गोर्डे, सागर जाधव ,कुणाल लोणारी, संतोष जाधव, अमोल शेलार यांची निवड करण्यात आली. तर शहर संघटकपदी अमित बांगर, उपशहर संघटकपदी वसीम चोपदार, शेखर बोरावके, सनी काळे, सागर फडे यांची निवड झाली. शाखाप्रमुख पदी सोमनाथ लोहकणे, किरण पहिलवान, अनील शेलार, राहुल कौरे, दीपक कराळे, अतिश बोरुडे, नितीन जाधव, लक्ष्मण काटकर , सोमनाथ जाधव , वसीम पटेल, संतोष पिंगळे,प्रसाद पगारे, अशोक नरोडे ,अमोल घंगारे, नवनाथ ताकवाले आदीच्या निवडी करण्यात आल्या.

 यावेळी शहरप्रमुख सनी वाघ म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे कार्य तळागाळात पोहोचविण्यासाठी, पक्ष संघटना बांधणीसाठी तसेच शहरातील सर्व सामान्याचे ही कार्यकारणी काम करणार आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.