Breaking News

देहविक्री करणार्‍या महिलांबरोबर रक्षाबंधन

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील युवा चेतना फौंडेशन,नगर आणि स्नेहज्योत प्रकल्पाचे कार्यकर्ते यांनी स्नेहालयातील शोषित आणि उपेक्षित देहविक्री करणार्‍या महिलांबरोबर रक्षाबंधन साजरा केला. सर्व महिलांनी सामाजिक कार्यकर्त्यांना राख्या बांधून आनंद व्यक्त केला.
यावेळी महिलांकडून राखी बांधून घेऊन सर्व सहभागींना पंतप्रधान विमा योजना प्रदान करण्यात आला. या महिलामध्ये अनेमिया (रक्ताक्षय)चे प्रमाण जास्त रुग्ण आढळून येतात. त्याकरिता महिलांनी आपल्या रोजच्या आहारात काय बदल करून कोणत्या आहाराचा समावेश करणे आवश्यक आहे याबाबत प्रवीण मुत्याल यांनी माहिती दिली.
यावेळी युवा चेतना फौंडेशनचे संचालक अमर कळमकर, सदस्य जिल्हा बाल कल्याण समिती प्रवीण मुत्याल, सामाजिक कार्यकर्ते योगेश काकडे, अशोक चिंधे, बाबासाहेब सांगळे, देविदास बोरुडे, किशोर डमाळे, गणेश दारूकुंडे, नितीन शिंदे, स्नेहज्योत प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक दीपक बुरम, सचिन बोरुडे, आकाश काळे, मीना पाठक, आशा जाधव आदी उपस्थित होते.