Breaking News

चंद्रकांत खैरे वैजापूर मतदारसंघातून विधानसभा लढणार ?

मुंबई
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचार मोहिमांना सुरूवात केली असून, लोकसभा निवडणूकीत पराभव पत्करलेल्या चंद्रकांत खैरे देखील विधानसभेचा सुरक्षित मतदारसंघ शोधतांना दिसून येत आहे. चंद्रकात खैरे आता विधानसभानिवडणुकीत रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी त्यांनी तयारी सुरु केली असून सध्या त्यांनी वैजापूर मतदारसंघात दौरे सुद्धा सुरु केले आहेत. शिवसेनेचे माजी आमदार आर.एम. वाणी यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केल्याने मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याने चंद्रकात खैरे यांनी वैजापूरमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. औरंगाबाद मतदासंघातून सलग चार वेळा खासदार राहिलेल्या खैरेंना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.त्यामुळे खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला आणि सद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या वैजापूर मतदारसंघातून खैरे आपले नशीब अजमावणार असल्याचे बोलले जात आहे.