Breaking News

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे स्वखर्चातून मुरुमीकरण

 संगमनेर/प्रतिनिधी
 संगमनेर-कोपरगाव महामार्गावर भागवतवाडी शिवारात पावसामुळे पडलेले खड्डे व त्यामुळे होणारे अपघात या सर्व समस्या दुर होण्यासाठी भागवतवाडी येथील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व महेंद्र गोडगे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक काम हाती घेऊन स्वखर्चाने मुरूम घेऊन रस्त्यावरचे खड्डे बुजवाचे काम हाती घेतले.
  यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्ते मनोज भागवत, ऋषिकेश भागवत, संदीप भागवत, नानू भागवत, राहूल भागवत, प्रदिप भागवत, लक्ष्मण भागवत, सागर भागवत, पप्पू चव्हाण, दादासाहेब भागवत, प्रल्हाद भागवत, बंटी भागवत, भाऊसाहेब भागवत, रवी दिघे, चांगदेव दिघे, गणेश खालकर, दिपक जगताप उपस्थित होते.
  यावेळी संदीप भागवत म्हणाले की, तालुक्याच्या वाडी-वस्तीवर विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. आम्ही अगदी टोकावर असूनही अनेक विकास कामे थोरात यांच्या मार्फत झाले आहेत. परंतु भाजप सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यासाठी आम्ही अनेकवेळा निवेदने दिली आंदोलन केले. मात्र, सरकारला कोणताही फरक पडला नाही. या खड्ड्याांमुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहनांची मोठी वर्दळ असल्याने हे खड्डे सातत्याने उघडले जात आहेत. यावर पर्याय म्हणून शासना ऐवजी आम्हीच आता स्वखर्चातून पुढाकार घेत खड्डे बुजवत आहोत. शासनाला कधी जाग येणार हा आमचा प्रश्‍न आहे. अनेकांचे जीव धोक्यात आले आहे. परंतु युवक काँग्रेसच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.