Breaking News

मोकाट जनावरांवरील कारवाईचा फज्जा

संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेर नगरपालिकेकडून मागील आठवड्यात शहरातील मोकाट जनावरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले असले तरी अद्याप या जनावरांवर कारवाई काही होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर, शाळा महाविद्यालय परिसरात हि मोकाट जनावरे मुक्त संचार करत असल्याचे आढळून येत आहे.

 मोकाट जनावरांच्या अडथळ्यामुळे वाहनांच्या अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे नगरपालिकेने मोकाट जनावर मालकांविरोधात दिलेले कारवाईचे आदेश हवेतच विरले कि काय असा प्रश्न पडल्या शिवाय रहात नाही. नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी या जनावर मालकांना आप आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवण्याचे आवाहन केले होते, परंतु त्याचा काही एक परिणाम झाल्याचे दिसत नाही. आता नगरपालिका या जनावर मालकांवर केव्हा कारवाई करते असा सवाल नागरिक करीत आहे.

  संगमनेर नगरपरिषदेकडून अद्याप ३०-३५ जनावरांवर कारवाई करून त्यांची पांजरपोळ येथे रवानगी करण्यात आली आहे. परंतु अजूनही काही मोकाट जनावरे रहदारीला अडथळा निर्माण करत असल्याने नगरपालिकेकडून ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
-डॉ. सचिन बांगर, मुख्याधिकारी, संगमनेर नगरपालिका