Breaking News

पूरग्रस्तांसाठी साई संस्थानची दहा कोटी रुपयांची मदत

अहमदनगर / प्रतिनिधी
पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पुराने हाहाकार माजला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिर्डी येथील साईबाबा संस्थानने दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच डॉक्टरांची टीम आणि औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली आहे. राज्य शासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्यात आलेली ही आपत्ती मोठी असून या आपत्तीतुन बाहेर पडण्यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करीत असल्याचे डॉ. हावरे यांनी सांगितले.