Breaking News

जिल्हा पोलिसतर्फे ‘राखी वुईथ खाकी’

अहमदनगर/प्रतिनिधी
जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे प्रत्येक शाळेमध्ये ‘राखी वुईथ खाकी’ या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमांतर्गत भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलपासून बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.नि. विकास वाघ व पोलिस कर्मचार्‍यांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधून प्रारंभ झाला.
यावेळी प्रास्तविक विकास वाघ यांनी केले. सूत्रसंचालन शेख रुबीना यांनी केले तर आभार मनीषा गायकवाड यांनी केले. यावेळी संस्थेच्या कार्यवाहक छायाताई फिरोदिया, पत्रकार अरुण वाघमोडे, प्रकाश गांधी, अशोक मुथा, सुनंदा भालेराव, रुपीबाई बोरा स्कूलच्या प्राचार्या मावची, प्राचार्य भाबड आदी उपस्थित होते.