Breaking News

अवैध व्यवसायावर कारवाईची मागणी

नेवासे/प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील सुरू असलेले मटका,जुगारासह ईतर अवैद्य व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक अंबादास लष्करे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

  निवेदनात लष्करे यांनी म्हटले आहे की नेवासे शहरासह तालुक्यात सुरू असलेले मुंबई, कल्याण नावाचा जुगार राजरोसपणे सुरू आहे. पोलिस मटका बुकी चालकांवर मेहर नजर ठेवून मटका जुगारवर कारवाई करतांना त्यांच्या पंटरवर कारवाई करतात. मटका बुकी चालकाला अभय देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे तालुक्यात राजरोसपणे मटका जुगार सुरू आहे. त्यामुळे इतर अवैध व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. मटका व जुगारातून आर्थिक उलाढाल होऊन सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जात असल्याने तसेच काहींचे संसार उध्वस्त झाले असल्याने सदरचे व्यवसाय पंधरा दिवसाच्या आत बंद करण्यात यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लष्करे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.