Breaking News

दहा आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली
सिक्कीममधील सिक्कीम डेमोक्रेटीक पार्टी (एसडीएफ)च्या दहा आमदरांनी  भाजपत प्रवेश केला आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते राम माधव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. हे एसडीएफचे आमदार असल्याने माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. चामलिंग यांनी सिक्कीममध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम केला आहे. या वर्षी मेमध्ये त्यांच्या अध्यक्षतेत एसडीएफला पराभवाचा पराभव पत्करावा लागल्याने सत्तेतून बाहेर पडावे लागले.