Breaking News

पृथ्वीराज सिंह जडेजा यांचे उपराष्ट्रपतीकडून कौतुक

नवी दिल्ली
गुजरातमधील पूरग्रस्त भागातून दोन मुलींना खांद्यावर बसवून सुरक्षित ठिकाणी पोहचविणार्‍या कांस्टेबल पृथ्वीराज सिंह जडेजा यांचे आज खुद्द उप- राष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी कौतुक केले आहे. गुजरात पोलिसच्या या शूर जवानांची स्तुती करताना आपल्या ट्विटर संदेशात नायडू म्हणाले, मी कांस्टेबल पृथ्वीराज सिंह जडेजा यांच्या कर्तव्य निष्ठा और शौर्यस वंदन करतो ज्यांनी मोरबीतील पूरग्रस्त भागात दोन मुलींना खांद्यावर बसवून त्यांना सुखरूप पोहचवले. आपली कर्तव्य निष्ठा अनुकरणीय आहे. कांस्टेबल पृथ्वीराज सिंह जडेजा यांचा दोन मुलींना खांद्यावर बसवून नेतानाचा व्हिडीओ अनेक सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय बनला आहे. सध्या गुजरात सह देशातील अन्य भागात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. सततच्या मुसळधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.