Breaking News

सत्ता नसताना सुध्दा विकासकामात पुढे : पाचपुते

 श्रीगोंदे/प्रतिनिधी
 सर्व सामान्य जनता केंद्र बिंदू मानून त्यांच्या हितासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत निधी उपलब्ध करून तालुक्यात सत्ता नसताना सुध्दा आपण विकास कामात पुढे आहोत, असे उद्गार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी बोलताना काढले आहे.
 तालुक्यातील काष्टी येथे दत्त मंदिर महात्मा फुले चौक येथे सुमारे 9 कोटी 15 लाख रुपये खर्चुन तयार केलेल्या काष्टी ते बेलवंडी रस्ता कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी जेष्ट नेते भगवानराव पाचपुते होते. तर कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, माजी जि.प.सदस्य बबनराव मदने, जि.प.सदस्य सदाशिव पाचपुते, शिवाजीराव पाचपुते, अध्यक्ष विठ्ठलराव काकडे, उपसभापती वैभव पाचपुते, तालुकाध्यक्ष संदिप नागवडे, पं.स.सदस्य अमोल पवार, उत्तम मोरे, ज्ञानेश्‍वर राऊत व आदी पदाधिकारी हजर होते.
 यावेळी बोलताना माजी मंत्री पाचपुते म्हणाले की, विकास कामामुळे केंद्रात पुन्हा आपले सरकार आहे. तालुक्यातील वेगवेगळ्या कामासाठी लागणार्‍या निधीचा पाठपुरावा करून भाजप सरकारने मोठा विकास निधी दिला. त्यामुळे तालुक्यात अर्धवट राहिलेली विकास कामे आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजेतून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना काहीच करायचे नाही ते मात्र, कुठे फिरायला तयार नाही. कारण पाच वर्षात त्यांना जनतेच्या हिताचे एकही काम करता आले नाही. असे म्हणत पाचपुते यांनी आ. राहुल जगताप यांचा नाव न घेता समाचार घेतला. तालुक्यात आपण सत्तेवर नसलो तरी मी विकास कामे करण्यात कुठे कमी पडणार नाही. तुम्ही फक्त बरोबर रहा असे पाचपुते म्हणाले