Breaking News

कुस्तीपटू बबिता फोगट भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली
सुप्रसिद्ध कुस्तीपटू बबिता फोगट यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बबीता फोगट यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारत प्रवेश केला. बबिता यांच्या सोबत त्यांचे वडील आणि गुरु महावीर सिंह फोगट यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बबिता फोगट यांच्या प्रवेशामुळे हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षात मोठे पाठबळ मिळाले आहे.
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी तीन वेळा सुवर्ण आणि रौप्यपदक प्राप्त केले आहे. साली अभिनेता आमिर खान यांनी ’ दंगल ’ सिनेमातून फोगट बहिणींची कथा रुपेरी पडद्यावर सादर केली. सरकारने जम्मू-काश्मीर मध्ये कलम 370 रद्द करण्याचा तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा निर्णय घेतल्यानंतर बबिता फोगट आणि त्यांच्या परिवाराने केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले होते. बबिता फोगट यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी काश्मिरी मुलींवर दिलेल्या वक्तव्यावर त्यांचा बचाव केला होता आणि माध्यमांना उगाच वाद न निर्माण करण्याचा सल्ला दिला होता. खट्टर म्हणाले होते की, कलम 370 रद्द झाल्यामुळे आता काश्मिरी मुलींशी लग्न करता येईल. यावर सामाजिक माध्यमांवरून मनोहर लाल खट्टर यांची खूप टीका करण्यात आली होती.