Breaking News

व्यापाऱ्यांनी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद -आ. जगताप

  अहमदनगर/प्रतिनिधी

 नगर शहर चहुबाजूने वाढत आहे. त्याच वेगाने वसाहतीही वाढत आहेत. या सिमेंटच्या जंगलात कोठेतरी निसर्गाचे संवर्धन व्हावे, शहर हरित व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने आपले घर, दुकानाजवळ एकजरी झाड लावून जोपासले तर नगर शहर हरित होण्यास वेळ लागणार नाही. या चांगल्या दृष्टीकोनातून मार्केट यार्ड मधील व्यापारी मंडळींनी वृक्षारोपण व संवर्धनाचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

 कोठी रोड मशिनरी असोसिएशनच्यावतीने महात्मा फुले चौक ते कोठी रोड पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येक दुकानांसमोर झाड लावून दत्तक देण्याचा उपक्रम राबविला. आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते नगरसेवक गणेश भोसले यांच्या दुकानासमोर झाड लावण्यात आले. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे,  मार्केट कमिटीचे सभापती विलास शिंदे, माजी सदस्य रेवननाथ चोभे, संतोष म्हस्के, बाळासाहेब निमसे, बाबासाहेब खडसे, बंट्टी कराळे, अभिलाष घिगे, कोठी रोड  मशिनरी असोसिएशनचे धनेश कोठारी,  विलास कार्ले, गणेश कोठारी, हर्षल ओसवाल, परमेश्‍वर झांजे आदिंसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवरतन डागा यांनी केले. तर आभार हर्षल ओस्तवाल यांनी मानले. यावेळी प्रविण पटेल, धनराज जैन, सुभाष लगड, अमित बेद्रे, दत्तात्रय चेमटे, विजय वाबळे, सतीश वारुळे, सुनील ठाणगे आदिंसह व्यापारी उपस्थित होते.