Breaking News

भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारणी जाहीर

 भिंगार / प्रतिनिधी

   भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बौद्ध महासभा नगर जिल्हा कार्यकारणी जाहीर झाली. कार्यकारणी निवडीसाठी जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब गायकवाड व पश्चिम महाराष्ट्र राज्य संघटक मोहन ठोंबरे यांच्या उपस्थितीत भिंगार येथील सिद्धार्थ बौद्ध विहार, सदर बाजार, भिंगार येथे बैठक झाली.

 जिल्हा सचिवपदी सुनील ससाणे, सहसचिवपदी मिलिंद पगारे, जिल्हा उपाध्यक्षपदी, दत्तात्रेय  अाडबले,  जिल्हा कार्याध्यक्षपदी संतोष धीवर, नगर शहर संघटक संदीप विधाते, नगर तालुका अध्यक्ष  भगवान अर्जुन ठोंबरे आदी निवडी यावेळी करण्यात आल्या. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारून आभार व्यक्त केले.