Breaking News

निवासी डॉक्टरांचा संप स्थगित फोटो

अहमदनगर/प्रतिनिधी

 निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर गुरुवारी सकाळी स्थगित करण्यात आल्याची घोषणा सेंट्रल मार्डने केली. मेस्मा दाखल करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर डॉक्टराना त्वरित सेवेत रुजू होण्यास सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री उशिरापर्यंत डिएमइआर सोबत झालेल्या बैठकीत १५ दिवसांत विद्यावेतनाचा मुद्दा निकालात काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

  त्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर गुरुवारी सकाळीच सेवेत दाखल झाले. राज्यातील शहर उपनगरातील शासकीय, पालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी संपात सहभागी झाले होते. परिणामी, रुग्णालयांतील नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनांनी दिली होती. राष्ट्रीय वैद्यकीय विधेयक, विद्यावेतन वाढ, आजारी निवासी डॉक्टरांना रजा मंजूर करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.