Breaking News

भारताचा स्वातंत्र्यदिन काळादिन जाहीर करण्याचा ना ‘पाक’इरादा

इस्लामाबाद
भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणजे 15 ऑगस्ट. या दिवसाबाबत पाकिस्तानचे नापाक मनसुबे समोर आले आहेत. 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने या संदर्भातले एक पत्रकच जारी केले आहे.
सॅटेलाईट टीव्ही चॅनल्स, एफएम रेडिओ चॅनल्स या सगळ्यांना ही सूचना पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी कोणताही विशेष कार्यक्रम करायचा नाही, असे या पत्रकात पाक सरकारने म्हटले आहे. 15 ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडाही अर्ध्यावर आणावा. पाकव्याप्त काश्मीरबाबत पाकिस्तानची भूमिका काय, तेही स्पष्ट करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.