Breaking News

अंबेजोगाईत तिहेरी अपघातात दांपत्य ठार; सहा गंभीर जखमी

बीड / प्रतिनिधी
तीन वाहनांची धडक झाल्याने दोन जण जागीच ठार झाले असून इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री अंबेजोगाई येथे झाला.  अंबेजोगाईतील लातूर  रोडवर नंदगोपाल दूध डेअरीच्या जवळ दोन कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. अपघातात दोन  जणांनी जागीच आपला प्राण गमावला. दीपक सवडतकर आणि ज्योती दीपक  सवडतकर अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील जखमींना पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विनोद जाधव (42),  सुनील बिर्ला, गजानन निंबाळकर (35), राजेश बाळू उपाडे, संजय जोगदंड (30) अशी जखमींची नावे आहेत.