Breaking News

भारतीय संस्कृतीत आदिवासींना महत्वाचे स्थान : थोरात

संगमनेर/प्रतिनिधी
आदिवासी संस्कृतीला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून त्या संस्कृतीचे आपण सर्वांनी जतन केले पाहिजे असे विचार थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी मांडले.

  आदिवासी गौरव दिनानिमित्त कौठे मलकापूर येथे ठाकर समाजाच्या आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर हे होते. तर व्यासपीठावर आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, आदिवासी युवा कार्यकर्ते मदन पथवे, पोलिस उपनिरीक्षक उघडे, लकी जाधव, राहुल बर्डे,  सोमनाथ मधे, जना मैड, अविनाश आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते असंघटित कामगारांना संरक्षणासाठी लागणार्‍या साहित्याचे वाटपही करण्यात आले.

  यावेळी बोलताना प्रा. खरात म्हणाले कि, आदिवासी माणसाच्या रक्तात बेईमानी नाही. अजूनही नम्रता व  प्रामाणिकपणा कायम आहे. आदिवासी संस्कृती निसर्गपूजक, पंचतत्वांना देव मानते. निसर्गाला माता मानते.  स्त्री-पुरुष भेदभाव आदिवासी समाजात नाही. आदिवासी हे मूळ निवासी असून निसर्गपूजा करणारे आहे.

  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रघुनाथ गावडे , संदीप गावडे , विलास गावडे , अनिल अगिवले, शांताराम पथवे, मंगेश धराडे, संजय मेंगाळ , सुनील केदार , बाळकृष्ण गंडाळ, संजय केदार यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसेवक बाळासाहेब गांडाळ यांनी केले. आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित आदिवासी मेळावा संदर्भात माहिती जनसेवक संजय केदार यांनी दिली. सूत्रसंचालन संदीप दिघे यांनी तर विलास गावडे यांनी आभार मानले.