Breaking News

वासिंद येथे वीज समस्या निर्वारण बाबत ग्राहक सभा संपन्न!


शहापुर 
 वासिंद शहर व परिसरात निर्माण झालेली व नागरिकांना सातत्याने जाणवत असलेली विज समस्या निर्वारण साठी ग्रामपंचायत हॉल मध्ये ग्राहक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
शहापूर तालुक्यातील वासिंद येथे वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा त्यामुळे निर्माण होणारी पाणी समस्या, उशिरा मिळणारी वीजबिले (देयके), जुन्या विजपोल, तारा बदली रखडलेली मागणी अशा अनेक प्रकारच्या तक्रारींना सामोरे जावे लागत असल्याच्या नागरिकांच्या या समस्या बाबत व उपाययोजना करण्यासाठी तक्रार निवारण सभा घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी अनेक समस्या उपस्थित करून रखडलेले स्वतंत्र सबस्टेशन सुरू करावे अशी मागणी केली. यानंतर उपस्थित अधिकार्‍यांनी सर्व समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले.तर यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आमदार बरोरा यांनी म्हटले.
या तक्रार निवारण व चर्चेसाठी आमदार पांडुरंग बरोरा, विजवितरण मंडळाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार, सहा. अभियंता अमोल बिरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती धिर्डे, विभाग प्रमुख गुरुनाथ ठाकरे, शहरप्रमुख विकास शेलार, दताशेठ ठाकरे, सरपंच लता शिंगवे, महिला आघाडीच्या मिनल शेटे, ग्रा.पं. सदस्या प्रेरणा गायकवाड,  व्यापारी मंडळाचे अध्यक्ष निलेश काठोळे मनसेचे अमोल बोराडे, बंडू शृंगारपूरे, बाळाराम तरणे, जि.प. सदस्य मोहन जाधव, युवाध्यक्ष मोहन कंठे, संचालक अमोल तारमळे, अनिलजी मानिवडे, सुजाण वडके, सुभाष रोठे आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.