Breaking News

मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतिपथावर

विखे यांचा व्यापाऱ्यांशी 'संवाद' कार्यक्रम


संगमनेर/प्रतिनिधी
अर्थिकदृष्ट्या देशाला सक्षम करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी विविध घटकांशी सुरू केलेला संवाद ही आर्थिक क्षेत्रात बदलाच्या प्रक्रीयेची सुरूवात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बदलतोय, राज्यही प्रगतिपथावर जात आहे. लोकसभा निवडणूकीत मिळालेला जनाधार हा लोकांच्‍या मनातील कलच होता. विधानसभा निवडणूकीतही २२० जागांचे उद्दीष्ट साध्य करताना संगमनेरने आता मागे राहू नये आशी अपेक्षा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

  संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने विखे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यापारी आणि उद्योजकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सरकारची भूमिका स्पष्ट करतानाच व्यापार उद्योगात करांच्या संदर्भात निर्माण होणा-या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्याशी संगमनेरच्या व्यापा-यांशी चर्चा घडवून आणू आशी ग्वाही विखे यांनी याप्रसंगी दिली.

 उद्योजक डॉ.संजय मालपाणी, अध्यक्ष निलेश जाजू , माजी नगराध्यक्ष राधावल्लभ कासट, संचालक श्रीगोपाल पडतानी, ज्ञानेश्वर करपे, शिवसेनेचे आप्पा केसेकर, संजय फड, राजेंद्र सांगळे यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दक्ष महेश कटारिया या विद्यार्थ्‍याच्‍या शोधासाठी मंत्री विखे पाटील यांनी केलेल्‍या सहकार्याबद्दल कटारिया परिवाराच्‍या वतीने सत्‍कार करुन कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यात आली.

  व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना विखे म्हणाले की, महाजनादेश यात्रेच्या निमिताने मुख्यमंत्री संगमनेरात येत आहेत. त्यावेळी तुमच्या शिष्टमंडळाशी भेट घडवून आणण्याचे आश्वासित केले.