Breaking News

जॉगिंग पार्क मनपाने भाडेकराराने देऊ नये

अहमदनगर/प्रतिनिधी
“ सावेडी उपनगरातील जॉगिंग पार्क हे मनपा भाड्याने देत असल्याने त्या मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदान हे खेळण्यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे महानगरपालिकेने हे मैदान भाड्याने देऊ नये’’ या मागणीसाठी नगरसेवक महेंद्र गंधे यांच्या नेतृत्वाखाली 14 ऑगस्टच्या मनपा जनरल बोर्डामध्ये समर्थ शाळेच्या विद्यार्थिनी शिक्षकांसह मोर्चा आणण्यात आला.
यावेळी नगरसेवक मनोज दुलम, नगरसेविका आशा कराळे उपस्थित होत्या. यापूर्वी अनेक वेळा या बाबत मनपा कडे व नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केला आहे. हा विषय आज सर्वानुमते मंजूर करावा,अशी मागणी नगरसेवक महेंद्र गंधे यांनी जनरल बोर्डामध्ये केल्यानंतर सावेडी जॉगिंग पार्क हे महानगरपालिका मोजक्याच 3-4 कार्यक्रमाला नियम व अटीच्या तत्वावर देईल, इतर कोणालाच देण्यात येणार नाही, असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितल्यावर या निर्णयास एकमताने सर्व नगरसेवकांनी मंजुरी दिली.